Sunday, August 25 2019 12:11 am

मुंबईतील राष्ट्रवादीच्या तब्बल ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय

नवी मुंबई :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांचे होणारे पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था डबघाईला आली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या एक नाही दोन नाही नंतर तब्बल ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला असून राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना हा  निर्णय कळवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश नाईक भाजप प्रवेशाची औपचारिक घोषणा करतील अशी चर्चा सुरू आहे.  नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या बोलावलेल्या या बैठकीत नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून  नगरसेवकांच्या या निर्णयावर आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या निर्णयामुळे भाजपची नवी मुंबई महापालिकेत सत्ता येणार आहे.