Sunday, September 15 2019 3:15 pm

मुंबईकरांच्या पाणी दारात अडिच टक्क्यानं महागलं

मुंबई : दुष्काळ परिस्थितीमुळे मुंबईच्या पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी असून मुंबईकरांना पाणीकपातीची  झळ सोसावी लागणार आहे. त्यात भर म्हणजे मुंबईकरांचे पाणी पण महागणार आहे.  पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.तब्बल  अडिच टक्क्यानं   पाणीपट्टीचे दर वाढवण्यात आले आहे. 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. दरवर्षी ८ % पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा अधिकार  मुंबई महापालिका प्रशासनानं यापूर्वीच मंजूर करवून घेतलाय. घरगुती पाणीदरात सरासरी 10 ते 15 पैसे तर व्यावसायिक पाणीदरात 1 ते 4 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. सध्या मुंबईत 10% पाणीकपात सुरु आहे. एकीकडे पाणीकपात सुरु असतांना प्रशासनानं केलेली पाणीपट्टीच्या दरातली वाढ ही अन्यायकारक असल्याचं विरोधकांनी म्हणटलं आहे.

 गेल्यावर्षी 3.72 टक्के दरवाढ करण्यात आली होती. तर यावर्षी ही वाढ 2.48 टक्के असणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने स्थायी समितीमध्ये बुधवारी निवेदन केले.