Saturday, April 20 2019 12:40 am

मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले  हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली होती .मिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे झालेल हेंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद एकबोटे हे स्वतःहून पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनतर बुधवारी सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंवर अटकेची कारवाई केली. आज पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना 19मार्चपर्यंत पोलिस कोठडी बजावली आहे.