Tuesday, January 22 2019 1:33 pm

मिलिंद एकबोटेंना दुसऱया गुन्ह्यात 4 दिवसांची पोलिस कोठडी

पुणे :भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना दुसऱया एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या येरवडा कारगृहात असलेल्या एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

भीमा कोरेगाव येथे दंगल घडवून आणल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर प्रमुख सुत्रधार म्हणून ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगलीची चिथावणी आणि कट कारस्थान केल्याचे दोन गुन्हे मिलिंद एकबोटे यांच्यावर अनुक्रमे पिंपरी आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.