Sunday, September 15 2019 3:18 pm

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का;पार्थ पवार पिछाडीवर

पुणे :- मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारी साठी उभे असलेले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व  अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे तब्बल ७४ हजार ४८७ मतांनी मागे पडले आहेत. त्यामुळे  मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मावळमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना कडवी लढत दिली होती. मुलाच्या विजयासाठी अजित पवार हे मावळमध्ये ठाण मांडून बसले होते. शेतकरी कामगार पक्षानंही राष्ट्रवादीला मदतीचा हात दिला होता. मात्र, या कशाचाही फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं दिसत नाही.

मावळमध्ये आतापर्यंत एकूण ४ लाख ५८ हजार मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी श्रीरंग बारणे यांना २,४५,०४३ तर, पार्थ पवार यांना १,७०,५५६ मते मिळाली आहेत.  अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.