Thursday, January 24 2019 6:02 pm

मालवण येथे होणा-या सागरी जलतरण स्पर्धेसाठी स्टारफिशचे जलतरणपटू सज्ज !

ठाणे-:मालवण चिवला बीच येथे होत असलेल्या सागरी हौशी जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टसअ‍ॅकॅडमीचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. हे सर्व जलतरणपटू या स्पर्धेसाठी शुक्रवारी मालवण येथे रवाना होणार आहेत. गतवर्षीच्यास्पर्धेत देखील स्टारफिशच्या मयंक चाफेकर या जलतरणपटूने 5 कि.मीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित फिरत्या चषकावर आपले नावकोरले होते. यंदाही हा चषक पटकाविण्यासाठी सर्व जलतरणपटू गेल्या अनेक दिवसांपासून सरावासाठी मेहनत घेत आहेत.

मालवण येथील चिवला बीचवर 16 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होत आहे.5 कि.मी,3 कि.मी,2 कि.मी,1 कि.मी,500 मीटर अशाविविध गटात ही स्पर्धा होणार असून या सर्व स्पर्धांमध्ये स्टारफिशचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुलपुरंदरे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे कसून सराव करीत असूनयंदाही या स्पर्धेत स्टारफिशचे जलतरणपटू यशस्वी कामगिरी करतील असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. या सर्व जलतरणपटूंनाप्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी कोकण पदवीधर मंचाचे आमदार व ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष  अ‍ॅ ड. निरंजन डावखरेयांनी सर्व स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करुन सर्व स्पर्धक निश्चितच यशस्वी होवून मालवणच्या किल्ल्यावरस्टारफिशचा झेंडा फडकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     या सर्व स्पर्धकांना नेहमीच महापौर मिनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारीमहेश राजदेरकर, वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा वैशाली नेरपगारे,सचिव मनोज कांबळे यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते. या सर्वांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या असून निश्चितच स्टारफिशचे सर्वजलतरणपटू निश्चितच ठाण्याचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.