मुंबई २६:- चला तर मग संजय ‘डाउट’ तुमच्या मालकांना बॅग भरून पाकिस्तानात पाठवा, कारण तुम्हीच ट्विट केलेल्या महाराजांनी याच व्हिडीओमध्ये पुढे आदित्य वाकरे यांच्याकडे बोट दाखवून आशा महागद्दाराना पाकिस्तानात पाठवा असे सांगितले आहे, त्यामुळे तुमच्या मालकांचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल तुमचे तुमचे अभिनंदनच करायला हवे! असे मत व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी जैन मुनींच्या व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी संपूर्ण व्हिडीओ ट्विट करत जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
या व्हिडीओ मध्ये मुनींनी आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट करून ‘हिंदुत्व को ऐसें महा गद्दारोसे खतरा है’, ‘ऐसें लोगो को पाकिस्तान भेज देना चाहीये’.. असे म्हंटलं होते. कदाचित साधू महंताना भविष्यातले आधी समजते असे म्हणतात, त्यामुळे आज नाही तर उद्या हे बाप नंबरी आणि बेटा दस नंबरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकून हिंदुत्वाशी गद्दारी करणार हे त्याना तेव्हाच जाणवले असेल. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावध केलं होतं की “ऐसे गद्दारो को पाकिस्तान भेज दो”..खरं तर महाभारतातील संजयाला दूरचे दिसायचे, मात्र तुमची दृष्टी आधू झाली आहे लवकरात लवकर आपली दृष्टी तपासून घ्या आणि आपल्या मालकांची बॅग भरून त्याना पाकिस्तानात रवाना करा हीच नम्र विनंती अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडीओमधून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.