Wednesday, January 20 2021 12:59 am

मामलेदार मिसळ चे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ
मुर्डेश्वर यांचे मंगळवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर 1952 साली मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरु केले होते. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडीत सुरु ठेवली. गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते.
मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे.