Monday, September 28 2020 3:22 pm

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांचे आदेश

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व अधिका-यांना दिले.

उद्यापासून राबविण्यात येणारी ही राज्यव्यापी मोहिम ठाणे शहरात कशा पद्धतीने प्रभावीपणे राबविता येईल याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व अधिका-यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत महापालिका आयुक्तांनी या मोहिमेच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने आढावा घेवून या योजनेच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले. यावेळी त्यांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.