Tuesday, July 7 2020 1:29 am

माझा पराभव करण्यासाठी ठाकरें कुटुंबाकडून पैसे वाटप : अभिजीत बिचुकले 

मुंबई :- मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला असा आरोप अभिजीत बिचुकलेंनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलें हे वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभे होते.  काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं वरळीतून चार कोटी रूपयांची रक्कम जप्त केली होती. ती रक्कम आपल्याला हरवण्यासाठी आणल्याचा दावा, बिचुकलेंनी केला.मी मुंबईत आलो आणि मुंबईकरांनी आपल्याला खुप प्रेम दिलं. वरळीतून मी निवडणूक अर्ज भरला. परंतु माझी लोकप्रियता पाहून आपला पराभव करण्यासाठी पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप बिचुकलेंनी केला.