Saturday, June 14 2025 5:39 pm

माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, दिनकरराव जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, १६ : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस. एम. कृष्णा आणि विधानपरिषदेचे दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, माजी विधानपरिषद सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.