Friday, December 13 2024 10:34 am

माजी मंत्री पद्माकर वळवी निवडणूक लढविण्याच्या तयारीत

नंदुरबार, 30 : आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळवी हे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील पद्माकर वळवी यांची आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे. वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु एखाद्या पक्षाने मला तिकिट दिले तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत.