Thursday, August 22 2019 4:19 am

माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना अटक – ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठाणे : ठाणे पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक. सुप्रसिध्द हिरानंदानी बिल्डर यांच्याकडे खंडणीसाठी बर्गे यांनी तगादा लावल्याचा आरोप आहे .
२००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते.त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांचे निकट वर्गीय म्हणून सुधीर बर्गे ओळखले जात होते.२०१७ साली झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा मध्ये मुख्यमंत्री च्या उपस्थितीत प्रवेश केला होता मात्र त्यांच्या पत्नीने लोकमान्य नगर येथून निवडणूक लडवली होती . सुधीर बर्गे सोबत आरटीआय कार्यकर्ते शौकत मुलानीआणि आणि आरिक इराणी यांना अटक करण्यात आली आहे .आरटीआय कार्यकर्त्यांची खंडणी उकळणारे रॅकेट मुंबई आणि ठाण्यात सक्रिय असल्याची तक्रार आमदार प्रताप सरनाईक यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानंतर चौकशी केल्यानंतर ह्या तिघांची नावे समोर आल्याचे कळत आहे .