Tuesday, June 2 2020 4:46 am

 माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच निधन

नवी दिल्ली :  माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते  अरुण जेटली यांच वयाच्या  ६६ व्या वर्षी  प्रदीर्घ आजारानं निधन झाले.  ९ ऑगस्ट रोजी जेटली यांना  श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा मुळे  ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु आज  नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या दोन वर्षापासून  अरुण जेटली हे आजारी असून  त्यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती  त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिलं होतं.