Monday, October 26 2020 2:44 pm

माजिवडा- मानपाडा प्रभागसमितीमधील साफसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे : स्वच्छता पंधरवडा निमित्त शहरातील साफसफाईची मोहिम जोरात सुरू असून आज माजिवडा-मानपाडा प्रभागसमितीमधील परिसराची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

आज सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ढोकाळी रोड, कापूरबावडी नाका येथून चालत साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये ढोकाळी रोड, कापूरबावडी नाका, सफायर बिल्डिंग, हायलँड हॉस्पिटल, कोलशेत रोड, डी मार्ट, नंदीबाबा मंदिर, मनोरमा नगर, आर मॉल आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची पाहणी केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले असून ते रोज एका परिसराची पाहणी करीत आहेत. या पाहणी दौ-या दरम्यान स्थानिक नगरसेवक संजय भाईर आणि भूषण भोईर यांनी महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त(2)संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर आदी उपस्थित होते.