ठाणे ०८ : ठाणे महापालिकेच्यावतीने आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम दादलानी येथे अशोक नगरच्या मागे सर्व्हे क्र. 146, हिस्सा नं. 1 ब या भूखंडावर रितेश पाटील व अतिश पाटील यांनी केलेले अतिक्रमण निष्कसित करण्याची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत करण्यात आली.
बाळकूम दादलानी येथे अशोकनगरच्या मागे असलेल्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची तक्रार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाली होती. त्यानुसार सर्व्हे क्र. 146 या भूखंडावरील ४० x ४० , १५x२० , २०x२०, ३०x३५ पत्राशेडची अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली. तसेच प्लॅस्टिक भंगार व काच भंगार जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच बाळकुम नाका भिवंडी रस्त्याच्या डावी बाजूकडील हातगाड्या तसेच गॅरेजचे शेड जेसीबी मशीनने तोडण्यात आले.
सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील कार्यालयीन अधीक्षक व अतिक्रमण नियंत्रण पथक यांनी ठेकेदाराची वाहने, मनुष्यबळाच्या सहाय्याने करण्यात आली. ही कारवाईदरम्यान कापूरबावडी पोलीस स्टेशन व ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडील उपलब्ध पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.