Monday, June 17 2019 4:06 am

महिन्याभरात दहा हजार नवीन वीज जोडण्या

अकोला : अकोला, वाशिम व बुलडाणा मंडळामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात 10721 घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याबरोबरच नादुरुस्त व बिघाड 10527 वीज मीटरसुद्धा बदलण्यात आले आल्याचे महावितरणने म्हटले आहे.परिमंडलात एका महिन्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या दहा हजारापेक्षा जास्त वीज जोडण्या दिल्या. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २६४८ जोडण्या देण्यात आल्या असून, ५०७९ मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत. बुलढाणा मंडळामध्ये ७०७२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, ३१२१ मीटर बदलण्यात आले आहेत. तर वाशिम मंडळामध्ये २०११ नवीन वीज जोडण्या दिल्या तर एकूण २४२७ मीटर बदलले आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या अर्जदारांना वीज जोडणी तत्परतेने देण्यात येत आहेत.
अकोला परिमंडळातील सर्वच कार्यालयामध्ये मुबलक प्रमाणात नवीन मीटर उपलब्ध असून त्यामुळे मीटर नसल्याची सबब सागून नवीन जोडणी करिता वा बदलाकरिता टाळाटाळ करीत असल्यास तसेच नादुरुस्त बिघाड असलेले मीटर बदलताना एजन्सीच्या कर्मचाºयांनी चुकीची माहिती, दिशाभूल वा पैशाची मागणी केल्यास थेट विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.