मुंबई, 10 : नवी मुंबई परिसरात महामुंबई विकसित होत आहे. या महामुंबईच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून त्यातील खारकोपर ते उरण ही उपनगरीय सेवा येथील नागरिकांना मुंबईशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. महामुंबईच्या विकासात या रेल्वे सेवेचे महत्व अनन्य साधारण असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला मुंबई व नवी मुंबईसह राज्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांचाही समावेश आहे. महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने खारकोपर ते उरण या उपनगरीय रेल्वे मार्गाचे त्याचबरोबर बेलापूर उरण प्रकल्प मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव या सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. याचबरोबर वर्धा, यवतमाळ, नांदेड या प्रकल्पांतर्गत असलेला वर्धा-कळंब नवीन ब्रॉडगेज प्रकल्प, अहमदनगर-बीड-परळी या नव्या मार्गावरील न्यू आष्टी ते अमळनेर प्रकल्पांमुळे राज्यातील नागरिकांना होणारा लाभ, दळण-वळणाची सुविधा कशाप्रकारे विस्तारीत होणार याबाबतची माहिती डॉ. नीला यांनी ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून दिली आहे.
डॉ. नीला यांची मुलाखत दिलखुलास कार्यक्रमात शनिवार दि. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार, दि. 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://x.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR