Tuesday, July 23 2019 10:51 am

महावितरणच्या केबलच्या नुकसान प्रकरणी ठेकेदाराला कोर्टाचा दणका-ठेकेदार न्यायालयीन कोठडीत

ठाणे : एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईप लाईन खोदण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीच्या फटक्याने महावितरणच्या उच्च क्षमतेच्या केबलचे नुकसान झाले या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल केल्याने ठेकेदार मेसर्स. मल्हार इंटरप्राइझेसचे मोहन नेटके याना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
          नवीमुंबई येथील शिरवणे  परिसरातील एमआयडीसीच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा ठेका मेसर्स. व्ही यु बी याना देण्यात आला होता. ७ मार्च, २०१९ रोजी दुपारी प्लॉट क्र डी-४३ समोर जेसीबीने खोदकाम सुरु होते. याठिकाणी महावितरणच्या उपकेंद्रातून आलेली २२ के.व्ही क्षमतेची डी वाय पाटील वाहिनी क्र ३ च्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी केबलला जेसीबीच्या फटक्याने नुकसान झाले. महावितरणचे १ लाख १३ हजार ६३७ रक्कमेचे आर्थिक नुकसान आणि ग्रहकांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकरणी नुकसान भरपाईची मागणीसाठी महावितरणचे अभियंता यांनी ठेकेदार मोहन नेटके यांच्याकडे  पाठपुरावा केला. मात्र नेटके या ठेकेदारां कडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली . अखेर महावितरणाचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्या निर्देशानुसार नेटके यांच्या विरोधात  तुर्भे पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३९ व १४० तसेच भादंवि ४२५ व ४२६ नुसार गुन्हा दाखल  केला. या प्रकरणी या कामाचे ठेकेदार मेसर्स. जय मल्हार एन्टरप्राइझेसचे नेटके याना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने ठोठावली.