Wednesday, August 12 2020 8:38 am

महाराष्ट्र सायबर विभाग ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसवे संदेश सायबर भामट्यांपासून सावध रहावे, महाराष्ट्र सायबर चे आवाहन

मुंबई  :ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नये व सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे करण्यात येत आहे.
सध्या कोरोना महामारीच्या काळात असा फसवा व्हाट्सअँप मेसेज फिरत आहे कि , एक विशिष्ट मोबाईल अँप डाउनलोड केले तर तर ,तुम्ही घरच्या घरी आपले body pulse व रक्तातील oxygen चे प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या pulse -oxy meter हे उपकरण घ्यायची गरज नाही ‘ व त्याबरोबर सदर मोबाईल अँप डाउनलोड करायची लिंक दिली असते .
महाराष्ट्र सायबर तर्फे
सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की ,
१)कृपया अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका .
२) वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाईल अँप्स वरून oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात .
३) मुळात pulse – pulse -oxy meter या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या मोबाईल अँपमधील सॉफ्टवेअर या मध्ये बराच फरक आहे . त्या प्रणाली मध्ये वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत जे या मोबाईल अँप मध्ये नाहीत .
४)अशी मोबाइल अँप ही सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयॊग सायबर भामटे तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात .
५) शक्यतो अशी मोबाईल अँप डाउनलोड करून वापरणे टाळा.
६) जर अशी कोणतीही मोबाईल अँप तुम्ही वापरत असाल तर आपल्या मोबाईलच्या settings मध्ये जाऊन या अँप्सना ठराविकच access allow करा.
केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.