Wednesday, August 12 2020 9:45 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा भगव्या रंगात – राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरे आता पक्षाची रणनीती लवकरच बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची माहिती मिळत आहे . कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलणार आहेत . मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली.पक्षाचा सुरुवातीचा प्रवास जसा आक्रमक होता.तसाच तो बदलत्या काळासोबत मावळात गेला. 2009 साली राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांचे 13 आमदार निवडून आले. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मात्र पक्षाला एकाच जागी समाधान मानावे लागले. दरम्यान.23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याची माहिती मिळत आहे.