Friday, February 14 2025 8:05 pm

महाराष्ट्राला रेल्वेकडून तब्बल १३ हजार ५३९ कोटींचा निधी

ठाणे, १९ : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राला भरीव निधी उपलब्ध झाला असून, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशन म्हणून विकास होईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, ठाणे रेल्वे स्थानकांसह विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला विक्रमी निधी उपलब्ध केला, याबद्दल भाजपाचे आमदार व प्रदेश प्रवक्ते निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. २००९-१४ या काळात महाराष्ट्राला केवळ १ हजार १७१ कोटी उपलब्ध झाले. तर केवळ २०२३-२४ या वर्षात १३ हजार ५३९ कोटी मंजूर झाले आहेत. राज्यात ३५ प्रकल्पांमध्ये ६ हजार १४२ किलोमीटर रेल्वेमार्गावर ९१ हजार १३७ कोटींची कामे सुरू आहेत. २०१४ पासून रेल्वे उड्डाणपूल व अंडरब्रिज उभारण्याची ७९३ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील रेल्वेजाळे मजबूत होणार आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.
रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पात महाराष्ट्रातील सात रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. या स्थानकांच्या विकासासाठी ४ हजार ९६२ कोटींची तरतूद केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी १८१३, मुंबई सेंट्रल स्थानकासाठी ८५०, ठाण्यात ८००, जालन्यात १७०, औरंगाबादमध्ये ३९०, अजनीत ३६० आणि नागपूर जंक्शन स्थानकाच्या विकासासाठी ५८९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी २८ फेब्रुवारी रोजी निविदा खुली झाली असून, १५ एप्रिल रोजी अंतिम केली जाईल. मुंबई सेंट्रलसाठी १५ एप्रिल रोजी, ठाण्यात ३१ मार्च रोजी, जालना व औरंगाबाद येथे १४ मार्च रोजी निविदा खुली होईल. मुंबई सेंट्रलसाठी १५ जून, ठाण्यात ३१ मे, जालना व औरंगाबाद येथे ३० एप्रिल रोजी निविदा अंतिम केली जाईल. नागपूर व अजनी येथे यापूर्वीच निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या वोकल फॉर लोकल नितीनुसार स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक स्टेशन एक उत्पादन योजना राबविली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील ७४ रेल्वे स्टेशनमध्ये स्टॉल उभारण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक कारागीरांना रोजगार उपलब्ध होईल, असे आमदार डावखरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १२३ रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेत रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. त्याचबरोबर रूफ प्लाझा व सीटी सेंटर निर्मिती, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी मोकळी जागा, रेल्वे कार्यालयांची योग्य ठिकाणी स्थलांतरित, एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची, एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी पुरेशी जागा, सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म (७६०-८४० मिमी) तयार केले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे ६०० मीटर, दिव्यांगांसाठी सुविधा आदी पुरविल्या जाणार आहेत.
अहमदनगर, अजनी, अकोला, आकुर्डी, अमळनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी, औरंगाबाद, बडनेरा, बल्लारशहा, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ, बोरिवली, भायखळा, चाळीसगाव, चांदा फोर्ट, चंद्रपूर, चर्नी रोड, चिंचपोकळी, चिंचवड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, दौंड, देहू रोड, देवळाली, धामणगाव, धरणगाव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेड, गोधनी, गोंदिया, ग्रॅंट रोड, हडपसर, हातकणंगले, हिमायत नगर, हिंगणघाट, हिंगोली, इगतपुरी, इतवारी, जालना, जेऊर, जोगेश्वरी, कल्याण, कामटी, कांजूरमार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोल्हापूर, कोपरगाव, कुर्डुवाडी, कुर्ला, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मलकापूर, मनमाड, मनवत रोड, मरिन लाईन्स, माटूंगा, मिरज, मुदखेड, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, मुर्तिजापूर, नागरसोल, नागपूर, नांदेड, नांदगाव, नांदुरा, नारखेड, नाशिक रोड, उस्मानाबाद, पाचोरा, पंढरपूर, परभणी, परळ, परळी वैजनाथ, परतूर, प्रभादेवी, पुलगाव, पुणे, पुर्णा, रावेर, रोटेगाव, साईनगर शिर्डी, सॅण्डहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, शेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजीनगर, सोलापूर, तळेगाव, ठाकुर्ली, ठाणे, टिटपाळा, तुमसर रोड, उमरी, उरुळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वडसा, वर्धा, वाशिम आणि वाठार या स्थानकांचा अमृत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे.
१८ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी
तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासणी
महाराष्ट्रातील १८ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे. या स्थानकांत दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नांदेड, वर्धा, ठाकुर्ली, पुणे, शिवाजी नगर, साईनगर शिर्डी, नाशिक रोड, मिरज, लोणावळा, भुसावळ, अमरावती, अकोला आदी स्थानकांचा त्यात समावेश आहे.
——————————
तक्ता
——————————
रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी
रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेला निधी

रेल्वे स्टेशनचे नाव विकासासाठी निधी निविदा खुली करण्याची तारीख निविदा अंतिम करण्याची तारीख
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८१३ २८ फेब्रुवारी २०२३ १५ एप्रिल २०२३
मुंबई सेंट्र्ल ८५० १५ एप्रिल २०२३ १५ जून २०२३
ठाणे ८०० ३१ मार्च २०२३ ३१ मे २०२३
जालना १७० १४ मार्च २०२३ ३० एप्रिल २०२३
औरंगाबाद ३८० १४ मार्च २०२३ ३० एप्रिल २०२३
नागपूर ५८९ निविदा मंजूर
अजनी ३६० निविदा मंजूर