Friday, October 30 2020 4:32 pm

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्याबाबतचा आदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी जारी केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्वीटद्वारे या आदेशाची प्रत प्रसारित केली आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन ३.० आज संपत आहे. लॉकडाऊन ४.० असणार आहे, मात्र त्यांचे स्वरूप वेगळे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते. केंद्र शासनाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच राज्य शासनाने लॉकडाऊनची मुदत वाढविल्याचा आदेश काढला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

नवीन लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. नव्या लॉकडाूनचे नियम काय असणार आहेत, याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र उत्सुकता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे स्वरूप राज्य सरकार स्पष्ट करतील असेही सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.

ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन नुसार विविध क्षेत्रांत सूट दिली जाणार आहे. कोणत्या झोनमध्ये किती आणि कोणत्या गोष्टींना सूट दिली जाणार त्याची नियमावली शासनाकडून स्पष्ट केली जाणार आहे.