Friday, December 13 2019 7:38 am

महाराष्ट्रात पूरस्थिती-ठाणे वर्ष मॅरेथॉन रद्द करून निधी पूरग्रस्तांना द्या-भाजपची मागणी

ठाणे : महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, कोकण विभाग रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली  पूरग्रस्तांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यांना आर्थिक मदत अन्नधान्य, कपडे अशी रसद पुरविण्यासाठी महाराष्ट्रभरातील सामाजिक संघटना मदतनिधी जमवीत आहे. तेव्हा ठाणे वर्ष मॅरेथॉन हि स्पर्धा यंदा रद्द करून त्यासाठी येणार खर्च हा पूरग्रस्तांना मदत म्हून द्यावी अशी मागणी भाजप गटनेते नारायण पवार यांनी भाजपच्या वतीने महापौर मीनाक्षी शिंदे याना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
              यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लाखो लोकांचे संसार उद्वस्त झाले आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांचे उध्वस्त जीवन सावरण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संस्था आणि सरकार प्रयत्नशील आहे. तसेच त्यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदनिधी गोळा करीत आहेत. यंदाची ठाणे वर्ष मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्याचा येणार खर्च पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन भाजप गटनेते नारायण पवार यांनी महापौर याना दिले आहे. त्यामुळे यंदाच्या ठाणे वर्ष मॅरेथॉनवर पुरग्रस्तांची सावट  आल्याचे दिसत आहे.