– वृत्तपत्रविक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
– आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश
ठाणे 11 लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मंजुरी मिळाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचे औचित्य साधुन गुरुवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात गेली सहा वर्षे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. संजय केळकर यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्यावतीने जाहिर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिवहन सदस्य विकास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वृत्तपत्र विक्रेते संजय सातार्डेकर, वैभव म्हात्रे, शरद पवार, समीर कोरे , दिलीप चिंचोले, संदीप अवारे , विवेक इसामे, भरत कुटे, सुरेश मस्करे, प्रदीप बिडलान, दिनेश भिंताडे, राजेंद्र सुर्वे, बंडू कदम, अजय मोरे, कृष्णा साळुंखे आणि गणेश शेडगे आदी उपस्थित होते.आ. केळकर यांनी यावेळी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले.
वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्वाचा घटक आहे.कामाची पध्दत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनानी सरकारकडे केली होती. आ. केळकर यांनी तर अनेकदा हा प्रश्न विधीमंडळात मांडला होता.तत्कालीन मंत्री संभाजी पाटील यांच्याकडे दाद मागितल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनाही साकडे घातले होते. त्यानंतर २०१८ च्या सुरुवातीला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,
गत अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती. तर आज कॅबिनेट बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला मंजुरी दिल्याने स्वप्न सत्यात उतरल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.