Wednesday, August 12 2020 9:18 am

महाराष्ट्राचा वीरपुत्र पाकच्या गोळीबारात शहीद

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. शुभम मुस्तापुरे  (20)असे या जवानाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते.

मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सुर्यकांत मुस्तापुरे  हे शहीद झाले. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मुस्तापुरे हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैल स्मरणात राहील,असे सैन्याने म्हटले आहे.