*आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या H2O समीकरणाच्या पाण्यावर माझ्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल – नरेश म्हस्के*
ठाणे , 03 -आनंद परांजपे व नजीब मुल्ला हे H2O समीकरण आहे. हायड्रोजन चे दोन अणू व ऑक्सिजनचे एक अणू मिळून पाणी बनते. याच पाण्यावर माझ्या खासदारकीच्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल, अशी स्पष्ट ग्वाही महायुतीचे ठाणे लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीचे ठाणे लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. यावेळी ते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.
शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी निवडणूकीला अवघे १० ते १५ दिवस शिल्लक असताना मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे ठाण्यातील महायुतीतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांत व महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात असलेला समन्वय. या समन्वयाच्या जोरावरच ठाणे लोकसभेची निवडणूक मी जिंकणार आहे. आनंद परांजपे खासदार होते तेव्हा मी पहिल्यांदा दिल्ली पाहिली. आता थेट खासदार म्हणूनच मी दिल्ली गाठणार आहे. खासदार म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य असेल. विविध पक्षात असताना पक्ष म्हणून वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात पण आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांच्याबरोबर माझी वैयक्तिक मैत्री कायम आहे, ती राजकारणाच्या पलिकडली आहे, आनंद परांजपे व नजीब मुल्ला हे H2O समीकरण आहे. हायड्रोजन चे दोन अणू व ऑक्सिजनचे एक अणू मिळून पाणी बनते. याच पाण्यावर माझ्या खासदारकीच्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल यात शंका नाही, असे मत महायुतीचे ठाणे लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.
यावेळी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वनिता गोतपागर, माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष विरु वाघमारे, ठाणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, ठाणे जिल्हा अल्पसंख्यांक विभाागाचे अध्यक्ष हुसेन मणियार, कार्याध्यक्ष रिकी मुरझेलो, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, अजय सकपाळ, महिला विधानसभा अध्यक्षा वंदना खानोलकर, सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे तसेच ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, फ्रंटल, सेल, विभागाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला, युवक, विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.
*प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, ठाणे लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी जीवाचे रान करेल व नरेश म्हस्के यांना निवडून आणील, असे म्हटले तर प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी, नरेश म्हस्के यांनी, खासदार म्हणून निवडून आल्यावर, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन केले. नरेश म्हस्के यांनी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्याबद्दल, आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन जाहीर स्वागत केले तर उपस्थित राष्टवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणांच्या व टाळ्यांच्या गजरात नरेश म्हस्के यांचे जोरदार स्वागत केले.*