Tuesday, December 1 2020 1:36 am

महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते शीळफाटा येथील नवीन अग्निशमन केंद्राचे लोकार्पण

ठाणे :33 मध्ये शिळफाटा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अग्शिमन केंद्राचा लोकार्पण सोहळा आज (18.11.2019) महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर ब्रह्मा पाटील, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा दिपाली भगत, नगरसेवक बाबाजी पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप उपस्थित होते.

शिळफाटा अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन ही माझ्याच हस्ते झाले होते आणि आज लोकार्पण सोहळा देखील माझ्याच हस्ते पार पडला असल्याचे महापौर मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी नमूद केले. तसेच यापूर्वी ठाणे शहरात स्वतंत्र इमारतीसह पायाभूत सुविधा असलेली एकूण 5 अग्निशमन केंद्र अस्तित्वात होती. माझ्या महापौरपदाच्या कारकीर्दीत अत्याधुनिक अशी 3 अग्निशमन केंद्र व 4 क्षेत्रीय केंद्र याची भर पडली असून ठाणे महापालिका हद्दीत एकूण 12 अग्निशमन केंद्रे आहेत. शीळफाटा येथे झालेल्या या अग्निशमनकेंद्रामुळे या परिसरातील एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत मिळणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नव्याने लोकार्पण करण्यात आलेले शिळफाटा येथील हे अग्निशमन केंद्र स्वतंत्र इमारत व पायाभूत सुविधांसह परिपूर्ण असे आहे. तळ अधिक दोन मजल्याच्या या इमातीत तळमजल्यावर चार अग्निशमनच्या गाडया उभ्या राहणार असून याच ठिकाणी नियंत्रण कक्ष व स्टोअर रुम उभारण्यात आले आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर कर्मचाऱयांसाठी जीमची सुविधा असून दुसऱया मजल्यावर स्वतंत्र कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. सदरचे अग्निशमन केंद्र हे ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभारण्यात आले आहे.