Wednesday, March 26 2025 5:23 pm

महापालिकेच्यावतीने माघी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष पथकाची नेमणूक

ठाणे 16 : माघी गणेशोत्सवातील गणेशाचे विसर्जन सुनियोजित पध्दतीने व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या विविध विसर्जन घाटावर महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पाच दिवस, सात दिवसांच्या गणेशाचे विसर्जनानंतर गणपती मूर्ती खाडीच्या किनाऱ्यालगत येवून तरंगतात व भाविकांच्या भावना दुखावल्या जातात यासाठी तसेच विसर्जन घाटावर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कोपरी, कोलशेत, पारसिक रेतीबंदर, बाळकूम, कळवा व दिवा या ठिकाणच्या खाडीकिनाऱ्यांवर विसर्जन घाट असून या ठिकाणीही विसर्जनासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच माजिवडा मानपाडा येथील रेवाळे तलाव, मासुंदा तलाव,दत्त घाट, खारेगांव तलाव, न्यू शिवाजीनगर कळवा तलाव येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, रायलादेवी तलाव, उपवन तलाव येथे विसर्जनासाठी प्रत्येकी दोन टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.