Tuesday, July 14 2020 11:37 am
ताजी बातमी

महापालिका महिला कबड्डी संघातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना महापालिका सेवेत सामावून घ्यावे : सभागृह नेते अशोक वैती

ठाणे :  महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील स्पर्धकांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील अध्यादेशानुसार 5 % आरक्षित जागेवर महापालिकेतील सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी  अभिनंदन ठरावान्वये महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

            ठाणे महानगरपालिका व ठाणेजिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या . या स्पर्धेत महिला गटात ठाणे महापालिकेचा  महिला कबड्डी संघविजेता ठरला. या संघाने केलेल्या भरीव कामगिरीमुळे ठाण्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. विविध खेळाच्या माध्यमातून खेळाडू त्या त्या शहराचे प्रतिनिधीत्व करुन आजीवन योगदान देत असतात. अशा काही खेळाडूंना शासनाच्या माध्यमातून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते व अशाच पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय /निमशासकीय व खाजगी क्षेत्रात 5 टक्‌के आरक्षण देवून त्यांना नोकरीत सामावून घेतले जात आहे. महापालिका कबड्डी संघात देखील राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डीपटूंचा समावेश आहे व त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत ही निश्चीतच अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कबड्डी या प्रकारामध्ये शिवछत्रपती पुरस्कारप्राप्‍त् खेळाडूंना राज्यशासनाच्या सेवेत  त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग 2 व वर्ग 3 या पदावर थेट सामावून घेतले जाते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणानुसार ठाणे महापालिका महिला कबड्डी संघात देखील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळ खेळलेले खेळाडू आहे. या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेण्यात यावे अशी सूचना दिनांक 20.02.2020 रोजी होणाऱ्या मा. सर्वसाधारण सभेत लेखी पत्रानुसार केली असल्याची माहिती सभागृह नेते अशोक बारकू वैती यांनी दिली आहे.