Sunday, December 16 2018 5:32 am

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांसोबत चेत्यभूमी सज्ज

मुंबई -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरयेथील चैत्यभूमीवर आणि शिवजीपार्कवर देशभरातील लाखो अनुयायांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.अनुयायांच्या कपड्यांचा रंग प्रामुख्याने निळा व सफेद असतो, त्यामुळे 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी निळीमय होणार आहे.
    देशाच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी शिवजीपार्क मैदानात विशेष वास्तव्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
    अनुयायांना शिवजीपार्कवर कोणतीही गैरसोय होणार नाही ह्याची विशेष दक्षता महापालिका आणि अनेक स्वयंसेवक संस्थांनी घेतली आहे.
विशेष आदरांजली-:
      भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबरला आदरांजली वाहण्यासाठी हारफुले, मेणबत्ती किंवा अगरबत्ती न आणता; त्याऐवजी वही व पेन वाहून आदरांजली वाहावी, असे आवाहन ‘एक वही, एक पेन अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे. महामानवाला महानिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीला जमतात. या अनुयायांना अभियानातर्फे हे आवाहन करण्यात आले आहे.