नवी मुंबई,08 :- महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोकण विभागाच्या सात ही जिल्हयांमध्ये विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नवनवीन संकल्पनेतून महसूल सप्ताह यशस्वीरित्या राबविल्याबद्दल महसूल मंत्र्यांनी अभिनंदन केले. कोकण विभागातील नागरिकांचा या महसूल सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राज्यात सर्वत्र दि.01 ऑगस्ट 2023 ते 07 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण विभागात विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वात या सप्ताह दरम्यान संपूर्ण कोकण विभागात विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी या सप्ताह दरम्यान लक्ष्य घालून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले आहेत. डॉ.कल्याणकर यांनी या सप्ताह दरम्यान कोकण विभागातील प्रत्येक जिल्हयात भेट देवून उपक्रम कसे राबविले जात आहेत. याचा आढावा घेतला. विभागातील सातही जिल्हयातील मंडळ स्तरावर, तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर “महसूल दिनाचे” कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला व “युवा संवाद” या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधून दाखले वितरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य शिबीर घेणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. “ एक हात मदतीचा” या कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देणे व इतर कार्यक्रम घेण्यात आले. “जन संवाद” या कार्यक्रमामध्ये शासकीय जमिनीचे भाडेपट्टयांचे नुतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, संजय गांधी निराधर योजनेअतंर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण. ई पीक पाहणी, सलोखा योजना राबविणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच महसूल आदालतींचे नियेाजन करण्यात आले. ‘एक गांव एक सलोखा’ योजना राबविण्यात आली. “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे पाल्यांना विविध प्रकरणांचे दाखले देण्यात आले. अनुकंपातत्वावर कर्मचारी यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तर महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले.
महसूल सप्ताहाच्या शुभारंभाला विभागीय आयुक्त कार्यालयात ‘जगणे सुंदर’ या विषयांवर श्री.प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी आर्थिक व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या सप्ताह दरम्यान कर्मंचाऱ्यांची सेवापुस्तके अद्यावत करण्यात आली. कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे अंतिम करण्यात आली. “लक्ष्मी योजने” अंतर्गत सातही जिल्हयात लाभार्थ्यांना 7/12 वितरण करण्यात आले.
महसूल सप्ताह सांगता समारंभानिमित्त महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणा-या उपजिल्हाधिकारी शितल देशमुख,नायक तहसिलदार,श्रीकांत कवळे, लघुलेखक,सुनिल वाघ, वाहनचालक सतिश देसाई,शिपाई संजय मोरे, हमाल प्रदिप भोसले,सेवानिवृत्त नायब तहसिलदार एकनाथ नाईक या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मा .राधाकृष्ण विखे –पाटील, महसूल, पशू संवर्धन व दुग्ध विकास यांच्या शुभहस्ते महसूल दिन गौरव-2023 प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर आयुक्त कोकण विभाग विवेक गायकवाड, उप आयुक्त महसूल कोकण विभाग व अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.