Wednesday, February 26 2020 9:41 am

मस्तवाल घंटागाडीच्या चाकाखाली दुचाकीस्वार ठार-चालक अटकेत

ठाणे : घंटागाडीची धडक बसून दुचाकीस्वार मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.अनिल देहेरकर (53) रा.माजिवडा,गोल्डन पार्क असे दुचाकीस्वाराचे नाव असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घंटागाडी चालक मोहन मंडल (41) याला अटक केली आहे.
          ठाणे पश्चिमेकडील माजीवडा परिसरातील गोल्डन पार्क सोसायटीत अनिल देहरकर हे पत्नी व मुलासह राहतात.अनिल हे वागळे इस्टेट,अंबिकानगर येथे नोकरीनिमित्त दररोज दुचाकीने ये-जा करीत.शुक्रवारी दुपारच्या सुमारास कामावर जात असताना कामगार रुग्णालयाच्या चौकात आले ठाणे महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला.यामुळे दुचाकीवरून घसरून ते थेट घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा चिरडून मृत्यू झाला अपघातानंतर घंटागाडी चालक मंडल याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.