Monday, June 17 2019 4:24 am

मराठा आरक्षणाला हायकोर्टाकडून मुदतवाढ

मुंबई -: मराठा समाजाला राज्य सरकारकडून 16 टक्के आरक्षण देण्यात आले असले तरीही मराठा आरक्षणावरील वाद संपुष्टात येण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. मराठा आरक्षणाला  आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (14 जानेवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील  यांनी मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कि  मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. जलील यांच्यापूर्वी जयश्री पाटील यांनीही मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.  या याचिकांवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.