Monday, June 17 2019 4:06 am

मनोरुग्णालयाची जागा ठाणे नवीन रेल्वे स्थानकासाठी महापालिकेला देण्याच्या निर्णयाला आरोग्य खात्याकडून तत्त्वता मान्यता

आज ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थनाकाच्या जागेसाठी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल होते. या बैठकीला मा.पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत , खासदार राजन विचारे,शिवसेना उपनेते विजय नाहटा, ठाणे  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, आरोग्य खात्याचे प्रधानसचिव प्रदीप व्यास संचालक पवार, उप संचालक तायडे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता एस एम महिश्वरी, महापालिकेचे  कार्यकारी  अभियंता पापळकर  व इतर अधिकारी उपस्थित होते

सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाणारे ठाणे रेल्वे स्थानक या स्थानकातुन दररोज 7.50 लाख प्रवासी ये-जा करीत असतात त्यामुळे ठाणेकरांना रेल्वेने प्रवास करणे म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करावा लागतो यासाठी याच्या विस्तारणासाठी जागा उपल्बध नसल्याने या स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या ठाणे मुलुंड दरम्यान असलेल्या मनोरुग्णलयाच्या 14.83 एकर अशी एकमेव जागा असल्याने या जागेवर नवीन रेल्वे स्थानक बांधण्यासाठी महापालिकेला रेल्वेने परवानगी दिली आहे यासाठी या आरोग्य खात्यासमोर महापालिकेने तीन पर्याय ठेवण्यात आले असून त्यापैकी पहिला या जागेच्या बदल्यात टी डी आर देण्यात येईल दुसरा बिल्डएबल एफ एस आय मध्ये बांधून देणार तिसरा पर्याय मध्ये या लागणाऱ्या जागेच्या मोबदल्यात   ग्रीन झोन मध्ये15 एकर अशी वाढीव जागा देणार  असे पर्याय ठेवण्यात आले त्यावर चर्चा झाली परंतु आरोग्य खाते  जागेचा मोबदला सद्याच्या बाजारभाव प्रमाणे द्यावे अशी मागणी करीत होते त्यावेळी त्या जागेची बाजारभावाप्रमाणे किमंत 32 करोड अशी होऊ शकते असे अंदाज काढण्यात आला त्यापैकी या  महापालिकेने दिलेल्या पर्यायी पैकी या जागेची किंमत 100करोड अशी होऊ शकते असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पस्ट केले त्यामुळे त्यांनी या पैकी एक पर्याय येत्या 7 दिवसात निवडून मंत्रिमंडळ त मंजुरी साठी पाठवून देण्याचा निर्णय या बठकीत घेण्यात आला