Wednesday, March 26 2025 5:36 pm

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा संपन्न सुरताल भजनी मंडळ

खोपोली यांनी पटकावला प्रथम क्रमांक

ठाणे दि : महाराष्ट्र नवनिर्माण सेना,ठाणे शहर यांच्या वतीने भजन स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहर यांच्या वतीने ठाण्यात आठ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.त्याचा एक भाग म्हणून शनिवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील केसर हॉल येथे सायंकाळी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये खोपोली, अलिबाग,भांडुप,दिवा,ठाणे आदी भागातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला. सर्वच मंडळांनी सुदर असे सादरीकरण केले यामध्ये सुरताल भजनी मंडळ,खोपोली यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना १०,००० हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह तर द्वितीय पारितोषिक ओम नादब्रम्ह भजन मंडळ ,अलिबाग, यांना ७००० हजार रोख स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,भांडुप यांना ५००० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट वादक सिद्धेश परब,उत्कृष्ट गायक चेतन पाटील, उत्कृष्ट कोरस श्री स्वामी समर्थ संगीत साधना भजनी मंडळ, उत्कृष्ट हार्मोनियम वादन श्री विसवटी प्रासादिक भजन मंडळचे प्रसाद साळसकर यांना प्रत्येकी १००० हजार व स्मृतिचिन्ह देऊन देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक,मनसेचे सचिव सचिन मोरे, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे,उप शहरअध्यक्ष पुष्कर विचारे,विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, आदींसह ओवळा माजीवडा विधानसभेतील पदाधिकारी,कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.