Wednesday, February 26 2020 8:13 am

मनसेच्या भगव्या झेंड्यामागे शरद पवारांचं डोकं- भाजप

मुंबई : हिंदू मतांच्या विभाजनासाठी शरद पवार चाणाक्षपणे मनसेचा वापर केला. शरद पवारांनी राज ठाकरेंचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली, म्हणून मनसे भगवी होत आहे. हिंदूधर्म किंवा महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली राज ठाकरेंना शक्ती देण्याचं काम शरद पवार करत आहेत. मात्र यामुळे भाजपचं नुकसान होईल, असं कुणाला वाटत असेल ते चुकीचे असल्याचा टोलाही गणेश हाके यांनी लगावला आहे.

 

मनसेचा झेंड्याच्या रंग बदलण्याचा प्रयोग फेल जाणार आहे. भाजपला वैचारिक गोंधळ असलेले तकलादू मित्र नकोत. देशात आणि राज्यात आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होऊ शकतो. मनसे आणि भाजप यांच्या कामात मतभेद आहेत. मनसेने आमचा विचार स्वीकारला तर मैत्रीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, याची आठवण हाके यांनी करुन दिली. वंचित बहुजन आघाडी भाजपची टीम बीचा प्रयोग करण्याची गरज नाही. मात्र मनसे राष्ट्रवादीची बी टीम म्हणून काम करत आहे, असा आरोप हाके यांनी केला.

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे.