Sunday, April 18 2021 10:41 pm

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष पदी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या वर्षभराआधी मनसेच्या पुणे विभागात मनसेत खांदेपालट केली आहे.

मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आज  त्यांनी या नियुक्तींची घोषणा केली.