Friday, June 13 2025 12:20 pm

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहराच्या विकास कामासंदर्भात घेतली महापालिका आयुक्तांची भेट

ठाणे महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या दिवा शहरातील विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेतली. दिवा शहरातील विकास कामे हे अतिशय संथ गतीने सुरू असून येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच विकास कामांचे मार्ग मोकळे करत लवकरात लवकर या ठिकाणीचे नागरी प्रश्न मार्गी लावावेत याकरिता आज ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसे आमदार राजू पाटील हे आले होते यावेळी महापालिका आयुक्त यांच्याशी तासभर चाललेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली

यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाशी युती करणार असल्याचे सूचक संदेशही दिले.