Tuesday, December 10 2024 7:59 am

मतदान जनजागृती मोहिमेव्दारे मतदानाचे महत्व पटवून द्यावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 14: – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने कामकाजात अधिक गतिमानता आणणे आवश्यक असून .भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, मतदान केंद्र संख्या, तेथील व्यवस्था, आदर्श मतदान केंद्र उभारणी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिल्या.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देश यांच्याबाबत संबंधीत कक्षांनी वेळोवेळी राजकीय पक्षांना अवगत करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर दिल्या आहेत.