Thursday, December 5 2024 6:11 am

मतदान जनजागृतीसाठी नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन जिल्हा प्रशासनाबरोबर झाले सक्रिय

ठाणे,16- १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप (Sveep) जनजागृती कार्यक्रमांतर्गत दि.11 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या दालनात आयोजित बैठकीस नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनच्या प्रतिनिधींना 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आपल्यामार्फत मतदानासंदर्भात जनजागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच असोसिएशन मार्फत जनजागृती करुन नागरिकांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.