Thursday, January 24 2019 7:18 pm

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : गेल्यावर्षी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर पुन्हा आज मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या  तरुणाचे नाव असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते आहे.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळय़ांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.