Tuesday, December 1 2020 1:26 am

भोपाळमध्ये ठाकूर विरुद्ध सिंह. चुरशीचा सामना

भोपाळ :- देशभरातील सर्वात महत्त्वाच्या जागांपैकी एक म्हणजे भोपाळ मतदारसंघ आहे. भोपाळ मतदारसंघ हा भाजपचा किल्ला मानला जातो. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरुद्ध दिग्विजय सिंह यांच्यात भोपाळमध्ये सामना रंगला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी आघाडी मिळवली असून आतापर्यंत 30 हजार मतांनी त्या पुढे आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी आपली जीत सेलिब्रेट करायला सुरुवात केली आहे.

साध्वी प्रज्ञा या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.उमेदवार म्हणून जाहीर झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे भोपाळ मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय बनुन राहिला आहे.

26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरें (माजी ATS प्रमुख)बाबत आणि त्यानंतर बाबरी मशिदीबाबत साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गदारोळ माजला होता. देशभरातून साध्वी यांच्यावर टीकादेखील झाली होती. तरिदेखील मतदारांनी मात्र साध्वी यांच्या बाजूने कौल दिला आहे.त्यामुळे आता याचा पूर्ण निकाल काय लागतो आणि काँग्रेस कडून यावर काय टिप्पणी होते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे