Wednesday, October 23 2019 5:25 am

भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही;खासदार संजय राऊत

नाशिक : आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्ष प्रवेश करत असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे  नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडले असून राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. असे राउत यांनी सांगितले. येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असं आश्वासन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलं. मी आहे तिथे बरा आहे असं भुजबळांनी काल सांगितल्यानं त्यांच्या प्रवेशाबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.