Saturday, January 23 2021 12:59 pm

भुजबळांनी साधला अजित पवारांवर निशाणा 

नाशिक :- बँक घोटाळ्या प्रकरणी शरद पवार हे  ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार होते परंतु त्याच दिवशी अजित पवार यांनी राजीनामा दिला.  दोन दिवसांनी राजीनामा दिला असता तरी चाललं असतं. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेवरुन छगन भुजबळ आणि अजित पवार या दोन मोठय़ा नेत्यांमध्येच जुंपली आहे. काही नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.
छगन भुजबळ म्हणाले, ज्या दिवशी शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते, त्यावेळी अजित पवारांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. दोन दिवसांनी दिला असता तरी चाललं असतं. बँकेचे सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्या गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण तापलं होतं. दोन दिवस तरी मीडिया व्यापला असता. पण संध्याकाळ होत आली, वातावरण झटकन बदललं आणि फोकस बदलला. राजीनाम्याचं कारण नव्हतं, निदान त्या दिवशी तरी द्यायला नको होता.