Thursday, August 22 2019 4:08 am

भिवंडी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या आरोपीस ८ दिवसात जेरबंद

भिवंडी : – भिवंडी शहरातील पद्मानगर मधून ०३ जून रोजी आईच्या कुशीत निजलेले १ वर्षाच्या बाळाचे एका अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. कुमार आशिक चंदुल हरजन असे या १ वर्षाच्या मुलाचे नाव आहे  आपल्या कुशीत बाळ नसल्याचे समजताच बाळाचे  वडिल चंदुल हरजन यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

भिवंडी पोलिसांनी कारवाई करताच मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोहित कोटेकर याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. आरोपी  रोहित कोटेकर यांने सुरज रमेश सोनी याच्या साथीने त्याच्यावर असलेल्या कर्जची परत फेडकरण्यासाठी त्या मुलेचे अपहरण केल्याचे कबुल केले.
अपहरण केलेल्या आशिक यास उत्तरप्रदेश येथील नेपाळ हद्दीतील एका गावात विक्री केल्याचे समोर आले. ,त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने एक पथक तातडीने  उत्तरप्रदेश येथील नेपाळच्या हद्दीत असलेल्या गावात पाठवले आणि तेथून एका महिलेच्या कब्जातून ते बाळ ताब्यात घेतले.
अपहरण करणाऱ्या आरोपींना भिवंडी पोलिसांनी ८ दिवसांच्या आत अटक करून त्या अपहरण झालेल्या बालकास त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले.