भिवंडी – 2 भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज विचित्र प्रकार पहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ माजला. पोलीसांनी यावेळी 19 आंदोलकांना ताब्यात घेतले.
भिवंडी येथे गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना मेरी पाठशाला या संघटनेने पाठबळ दिले आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु आज दुपारी या ठिकाणी एक विद्यार्थी भाषण देत असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना यावेळी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेत पोलीसांनी आतापर्यत 14 पुरूष आणि 5 महिला अशा 19 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.