Tuesday, June 2 2020 3:41 am

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली;बचाव कार्य सुरु

भिवंडी :- भिवंडीतील   शांतीनगर येथील  चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून  इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा अडीच वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून  शांतीनगर भागात पिरानीपाडा येथील सिटी लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफीस जवळ हि इमारात  होती  या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. धोकादायक असल्यामुळे आम्ही संपूर्ण इमारत खाली केली होती. मात्र, काही लोक परवानगीशिवाय या इमारतीत राहत होते. या दुर्घटनेत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला आहे. ही इमारत आठ वर्षे जुनी आणि बेकायदेशीर होती, असे भिंवडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी सांगितले.