Monday, January 27 2020 2:08 pm

भारत-ऑस्ट्रेलिया, भारत जिंकला आणि महेंद्रसिंग धोनी ठरला, मॅच फिनिशर !

अ‍ॅडलेड-: सामना जिंकायचा असेल तर डोकं कसं शांत ठेवायचं, याचा उत्तम वस्तुपाठ धोनीने यावेळी दाखवून दिला. अचूक फटके आणि धावण्यातील चापल्य, हे धोनीच्या खेळीत पाहायला मिळाले. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. आणि धोनीने आपल्यावर येणाऱ्या टिकास्त्रांवर काढला.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाचा संघ: एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन, पीटर सिडल, जे रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडोर्फ.