Saturday, April 20 2019 12:38 am

भारतीय विद्यापीठातील शिक्षकांकडून नजीब मुल्ला यांचे जोरदार स्वागत

नवी मुंबई : भारती विद्यापीठ नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये येथील शिक्षकांनी नजीब मुल्ला यांचे जोरदार स्वागत केले. तसेच, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नजीब मुल्ला यांना प्रथम पसंतीचे मत देण्याबाबत येथील शिक्षकांनी सुतोवाच केल.
शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या भारती विद्यापीठाच्या सभागृहात येथील शिक्षकांनीच पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होतेे. या बैठकीमध्ये शिक्षकांनी मुल्ला यांच्यासारखाच तडफदार उमेदवार आमदार म्हणून विधीमंडळामध्ये जायला हवे, असे  मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.     या बैठकीत भारतीय विद्यापीठ चे संचालक डॉ. विलास कदम, प्राचार्य डॉ शेख,श्री निवासान, प्रताप महाडिक , माजी खासदार संजीव नाईक, तकी चाउलकर, विद्यापीठ मधील हजारो शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान,  मुल्ला यांच्या विजयात भारतीय विद्यापीठ माध्यमातून झुकते तराजू असल्याने मुल्ला यांचा विजय निश्चित असल्याचे प्राचार्य विलास कदम यांनी सांगितले. तर, ज्या शिक्षक वर्गाने पिढी घडवण्याचे काम केले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी नजीब मुल्ला यांनी दिले.